Ruchika Jadhav
लांबसडक केस चांगले रहावेत यासाठी काही महिला केसांचा आंबाडा बांधतात.
पाठीवर केस असल्याने अनेक महिलांना गरम होते किंवा सहन होत नाही. त्यामुळेही त्या केस वरती बांधतात.
काही ऑफिसमध्ये महिलांना हेअरस्टाइल ठरवून दिलेल्या असतात. त्यांना अशाच पद्धतीने केस बांधायला सांगितले जाते.
आजकाल केस वरती बांधल्यामुळे त्याचे तुमच्या केसांवर वाईट परिणामही होतात.
सतत अशा हेअरस्टाइलने डोकेदुखी वाढते.
केस वारंवार बांधून ठेवल्याने त्यांची वाढ होत नाही.
केसांचा आंबाडा बांधल्याने केस समोरुन कमी होऊ लागतात आणि कपाळ मोठं दिसू लागतं.
तसेच या समस्यांमुळे केस गळती देखील मोठ्या प्रमाणावर वाढते.