Pune Fort : जुन्नरच्या डोंगररांगांतील अभेद्य किल्ला, 'हे' ठिकाण जपतंय ऐतिहासिक ठेवा

Shreya Maskar

पुणे

हडसर किल्ला हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नरच्या वायव्येस १३ किमी अंतरावर वसलेला, इ.स.पू. पहिल्या शतकातील एक ऐतिहासिक आणि टेकडीवर वसलेला आहे.

Pune | google

हडसर किल्ला

हडसर किल्ला ट्रेकिंगसाठी देखील बेस्ट आहे. हडसर किल्ला प्राचीन नाणेघाट व्यापारी मार्गाचे रक्षण करतो. या किल्ल्याची चढाई हडसर गावातून सुरू होते.

Hadsar Fort | google

दगडात कोरलेल्या पायऱ्या

दगडात कोरलेल्या पायऱ्या, प्राचीन गुहा-कोठारे आणि सभोवतालच्या निसर्गाची विहंगम दृश्ये यांचा एक रोमांचक मिलाफ येथे पाहायला मिळतो.

Rock-Cut Steps | google

स्थापत्यशैली

हडसर किल्ला हा सातवाहनकालीन एक वैशिष्ट्यपूर्ण किल्ला असून तो आपल्या अद्वितीय 'एकाश्म' स्थापत्यशैलीसाठी विशेषत्वाने ओळखला जातो.

Architectural Style | google

दुसरे नाव

हडसर किल्ला ज्याला 'पर्वतगड' म्हणूनही ओळखले जाते. पावसाळ्यात वीकेंडला येथे मित्रांसोबत वन डे ट्रिप प्लान करू शकता.

Alternative Name | google

एकाश्म वास्तुकला

या किल्ल्याचे प्रवेशद्वार, पहारेकऱ्यांच्या खोल्या, पायऱ्या आणि पाण्याची कुंडे हे सर्व थेट पर्वताच्या खडकात कोरून काढण्यात आले आहेत. हे बांधकाम प्राचीन काळातील असाधारण कारागिरीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

Architecture | google

ऐतिहासिक महत्त्व

सातवाहन काळापासून (इ.स.पू. १ले शतक ते इ.स. १ले शतक) अस्तित्वात असलेल्या या किल्ल्याने, कल्याणला दख्खनशी जोडणाऱ्या अत्यंत समृद्ध व्यापारी मार्गाचे रक्षण केले.

Historical Significance | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT :  गर्दी नाही, गोंधळ नाही; 'येथे' लपलाय अथांग समुद्रकिनारा, जणू मुंबईतला स्वर्गच

Mumabi Tourism | saam tv
येथे क्लिक करा...