Gym Or Yoga: फिट राहायचंय आणि वजनही कमी करायचंय? जिम की योगा, काय ठरेल बेस्ट?

Shruti Vilas Kadam

वजन कमी करण्यासाठी

कॅलरी बर्न करायच्या असतील तर जिममधील कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग उपयुक्त ठरू शकते. योगाही वजन नियंत्रणात मदत करू शकतो, विशेषतः संतुलित आहारासोबत.

Gym Vs Yoga Benefits

शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी

योगामुळे शरीर अधिक लवचिक बनण्यास मदत होते. विविध योगासनांमुळे स्नायू ताणले जातात आणि शरीराचा समतोल सुधारतो.

Gym Vs Yoga Benefits

स्नायू मजबूत करण्यासाठी

जिममध्ये वेट ट्रेनिंग केल्याने स्नायूंची ताकद आणि आकार वाढवण्यास अधिक मदत मिळते. त्यामुळे शरीर अधिक मजबूत बनू शकते.

Gym Vs Yoga Benefits

मानसिक आरोग्यासाठी

योगामध्ये प्राणायाम आणि ध्यानाचा समावेश असल्याने तणाव, चिंता आणि मानसिक थकवा कमी होण्यास मदत मिळू शकते.

Gym Vs Yoga Benefits

हृदयाच्या आरोग्यासाठी

जिममधील कार्डिओ व्यायाम आणि नियमित योगाभ्यास दोन्ही हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. योग्य पद्धतीने आणि नियमितपणे व्यायाम करणे महत्त्वाचे आहे.

Gym Or Yoga

दुखापतीचा धोका

योग योग्य मार्गदर्शनाखाली केल्यास तुलनेने कमी जोखमीचा असतो. जिममध्ये चुकीच्या पद्धतीने वजन उचलल्यास दुखापतीची शक्यता वाढू शकते.

yoga vs gym | google

कोणता पर्याय निवडावा?

जर तुमचे उद्दिष्ट स्नायू वाढवणे आणि फिटनेस सुधारण्याचे असेल तर जिम योग्य पर्याय ठरू शकतो. शरीराची लवचिकता, मानसिक शांतता आणि संपूर्ण आरोग्य सुधारायचे असेल तर योग फायदेशीर ठरू शकतो.

Gym Or Yoga | Saam Tv

Weight Loss: वजन कमी करायचंय? मग, रिकाम्या पोटी खा 'या' ७ गोष्टी; होईल झटपट फॅट बर्न

Weigh Loss | Saam Tv
येथे क्लिक करा