Weigh Loss: वजन कमी करायचंय? मग, रिकाम्या पोटी खा 'या' ७ गोष्टी; होईल झटपट फॅट बर्न

Shruti Vilas Kadam

कोमट पाणी आणि लिंबू

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. तसेच मेटाबॉलिझम सक्रिय होण्यास मदत मिळू शकते.

Lemon water | pinterest

भिजवलेले बदाम

रात्री भिजवलेले ५ ते ६ बदाम सकाळी खाल्ल्याने शरीराला प्रथिने, फायबर आणि हेल्दी फॅट्स मिळतात. त्यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते.

Badam Benefits

पपई

पपईमध्ये फायबर आणि पचनास मदत करणारे एन्झाइम्स असतात. रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने पचन सुधारण्यास आणि कॅलरी नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

Papaya | pinterest

भिजवलेले चिया सीड्स

चिया सीड्समध्ये फायबर आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर असतात. यामुळे भूक कमी लागते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळू शकते.

मोड आलेले मूग

मोड आलेल्या मुगामध्ये प्रथिने, फायबर आणि अनेक जीवनसत्त्वे असतात. सकाळी याचे सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि वारंवार भूक लागत नाही.

Sprouts Salad | Google

सफरचंद

सफरचंदातील फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरू शकतात. रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्याने जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते.

Apples

साखर नसलेले दही

प्रोबायोटिक्सने समृद्ध दही आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. त्यातील प्रथिनेही भूक नियंत्रित ठेवण्यास आणि वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना पूरक ठरू शकतात.

Dahi

Milk Honey Benefits: दररोज 1 ग्लास दूधात मध मिसळून पिण्याचे 7 फायदे; तिसरा फायदा वाचून थक्क व्हाल

Milk Honey Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा