Manasvi Choudhary
गुरूपौर्णिमा का साजरी करतात? कधीपासून सुरू झाली परंपरा? या विषयी या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
हिंदू धर्मात, गुरूपौर्णिमा या सणाला विशेष महत्व आहे. आज गुरूपौर्णिमा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. गुरूपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा, व्यास पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते.
गुरूपौर्णिमा साजरी करण्यामागे इतिहास आहे. महर्षि वेदव्यास यांना वेदांचे निर्माता म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार, महर्षि वेदव्यास यांचा जन्म आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी झाला होता त्यामुळे वेदव्यास यांचा जन्मदिन हा गुरूपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.
गुरूपौर्णिमा साजरी करण्याची जुनी परंपरा आहे. आजही परंपरा सर्वत्र पाळली जात आहे.
महर्षि वेदव्यास यांनी जनकल्याणासाठी आणि ज्ञानासाठी श्रीमद भगवद्गीतेसह एकूण १८ पुराणांची रचना केली.
गुरूपौर्णिमा हा दिवस गुरूंप्रती आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो.
गुरूपौर्णिमेच्या दिवशी शिष्य हा आपल्या गुरूंच्या चरणी पूजा करतात, त्यांना श्रीफळ, वस्त्र, फुले आणि दक्षिणा अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घेतात.