Saam Tv
गुरू म्हणजे ईश्वर, गुरू म्हणजे परमेश्वर.येत्या बुधवारी २९ जुलै २०२६ रोजी गुरूपौर्णिमा साजरी केली जाणार आहे.
भारतीय परंपरेत गुरूपौर्णिमेला विशेष स्थान आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते.
गुरूकुलाची पद्धत ही भारतात पार पूर्वीपासून चालत आली आहे. भारतात गुरूला ईश्वराचे स्थान दिले जाते.
गुरूला गुरूदक्षिणा देत आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. गुरूपौर्णिमेचा सण भारतासोबतच नेपाळ, भूतानमध्ये देखील साजरा केला जातो.
संस्कृत श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः। गुरुर्साक्षात परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः।। याचे नामस्मरण गुरुंना आदरांजली वाहिली जाते.
सगळ्यात पहिला गुरू आई, दुसरा ईश्वर, तिसरा पुस्तक, तत्त्व, ज्ञान, ज्यातून ज्ञान मिळत त्या सगळ्याचा या दिवशी सन्मान केला जातो.
जीवनातील अंधार दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणाऱ्या गुरूंप्रती आदर व्यक्त करणे हा यामागचा उद्देश आहे.
भारतीय संस्कृतीत महर्षी व्यास यांना प्रथम गुरू व जगद्गुरू मानले जाते कारण त्यांनीच मानवाला वेद, पुराण, अध्यात्माचे ज्ञान दिले. महाभारत ग्रंथांची रचना केली.
बोध प्राप्त झाल्यानंतर बुद्धांनी सारनाथ येथे याच दिवशी आपल्या शिष्यांना प्रवचन दिले त्यामुळे बौध धर्मात हा दिवस विशेष असतो.
या दिवशी शाळा आणि कॉलेज मधील मुले आपल्या शिक्षकांप्रती विविध कार्यक्रम करून कृतज्ञता व्यक्त करतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.