Ruchika Jadhav
गुलगुले चवीला फार छान लागतात. मराठमोळ्या घरांमध्ये हा पदार्थ हमखास बनवला जातो.
गुलगुले तांदुळ किंवा डाळीच्या पिठाचे बनत नाहीत. यासाठी गव्हाचं पीठ महत्वाचं आहे.
गुलगुले बनवण्यासाठी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घ्या.
गव्हात्या पिठात तुमच्या चवीनुसार मीठ मिक्स करून घ्या.
त्यानंतर गुळ बारीक किसून घ्या. किसलेल्या गुळाला पाण्यात विरघळत ठेवा.
त्यानंतर या पाण्यात आवडीचा रंग टाकून गव्हाचं पीठ मळून घ्या.
चव येण्यासाठी तुम्ही यात वेलची पुड देखील टाकू शकता.
कढईत तेल घेऊन गुलगुले चांगले तळून घ्या. मंद आचेवर गुलगुले तळून घ्या.