Ruchika Jadhav
आवळा मुरांबा बनवणे फार सोप्प आहे. यासाठी तुम्ही तुम्हाला हवा त्या आकारात आवळा कापून घ्या.
तुम्हाला आवळा कापून आवडत नसेल तर तुम्ही संपूर्ण आवळा जसाच्या तसा शिजवून घेऊ शकता.
आवळा शिजल्यावर गरम मसाल्यांची बारीक पूड बनवून घ्या.
आवळ्याचा मुरांबा बनवण्यासाठी साखर किंवा गुळ महत्वाचा आहे.
साखरेचा अथवा गुळाचा पाणी टाकून पाक बनवून घ्या.
तयार पाकात आवळा भीजत ठेवा. आवळ्याला कट केल्यास यात पाक चांगला मुरतो.
तुम्ही आवळ्याचा किस करून त्यात थोडी सुंठ पूड टाकूनही पाकात शिजवू शकता.
जेवणासोबत किंवा नुसता देखील हा आवळा खाणं अनेकजण पसंत करतात.