Siddhi Hande
घरोघरी सणासुदीच्या दिवशी गुलाबजाम बनवले जातात. गुलाबाजाम लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडीचा पदार्थ आहे.
गुलाबजाम बनवण्यासाठी सर्वात आदी खवा छान मऊ मळून घ्या.
खव्यात मैदा, बेकिंग पावडर, वेलची पावडर मिक्स करा. त्यानंतर त्यात पाणी टाकून मिक्स करा.
पीठाचे गोळे बनवून घ्या. त्यानंतर कढईत तेल गरम करा.
एका बाजूला हे गोळे गरम तेलात तळून घ्या.
यानंतर एका पातेल्यात साखर आणि पाणी उकळायला ठेवा.
हा पाक सतत हलवत राहा. त्यात केशर टाका. यात तुम्ही वेलची पावडरदेखील टाकू शकतात.
यानंतर तळलेले गुलाबजाम या पाकात भिजत ठेवा.यानंतर गुलाबजाम खाऊ शकतात.