Shreya Maskar
श्रावणात सणासुदीला बनवता येईल अशी Sweet डिश जाणून घ्या. सिंपल रेसिपी नोट करा.
गुलाब हलवा बनवण्यासाठी फुल क्रीम दूध, साखर, लिंबू , तूप, वेलची पावडर, ड्रायफूट्स, गुलाबाच्या पाकळ्या, केशर इत्यादी साहित्य लागते.
गुलाब हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये दूध गरम करायला ठेवून त्यात फुल क्रीम मिल्क घाला.
दूध खराब होऊ नये म्हणून लिंबाचा झेस्ट टाकून सतत ढवळत राहा.
दूध घट्ट झाल्यावर त्यात केशर, वेलची पावडर आणि साखर टाका.
आता पॅनमध्ये तूप टाका म्हणजे मिश्रण चिकटणार नाही.
दूध घट्ट झाल्यावर त्यात ड्रायफूट्स, थोड दूध आणि गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून टाका.
तयार झालेले मिश्रण एका प्लेट मध्ये घाला. मात्र त्यापूर्वी प्लेटला तूप लावा.
अशाप्रकारे गुलाब हलवा तयार झाला. हलवा सजवण्यासाठी त्यावर ड्रायफूट्स घाला.
पदार्थाला फुल मिठाईचा लूक येण्यासाठी चांदीचा वर्ख तुम्ही यावर लावू शकता.