Siddhi Hande
गुजराती स्टाईल खांडवी हा पदार्थ तुम्ही कधी खाल्लाय का? नाश्त्यासाठी हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे.
बेसन, ताक, दही, मिरच्या, सुकं खोबर, कोथिंबीर, आलं-लसूण पेस्ट, हिंग, मीठ, मोहरी, जिरे, हळद
सर्वात आधी तुम्हाला एका कढईत बेसन घ्यायचं आहे. या बेसनात ताक आणि दही मिक्स करुन छान हलवत राहायचं आहे.
यानंतर हिरवी मिरची आणि आलं लसूणची पेस्ट करुन घ्या. ही पेस्ट या पीठात मिक्स करा.
यानंतर हे मिश्रण सतत हलवत राहा. हे मिश्रण छान घट्ट होऊ द्या.
यानंतर एका ताटाला तेल लावून घ्या. त्यात हे मिश्रण थापून घ्या.
यानंतर या मिश्रणाच्या लांब पट्ट्या कापून घ्या. त्यानंतर एकेक पट्टीचा रोल बनवून घ्या.
एका पॅनमध्ये जिरे- मोहरी आणि कढीपत्त्याची छान फोडणी होती. ही फोडणी खांडवीवर टाका.
यानंतर वरुन खोबऱ्याचा किस आणि कोथिंबीर टाकून छान सर्व्ह करा.