Shreya Maskar
थाबडी पेडा काठियावाडी पेढा म्हणूनही प्रसिद्ध आहे.
थाबडी पेढा गुजरातमधील प्रसिद्ध पदार्थ आहे.
थाबडी पेढा बनवण्यासाठी दूध, साखर, तुरटी, वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स इत्यादी साहित्य लागते.
एका मोठ्या पॅनमध्ये दूध गरम करायला ठेवून सतत ढवळत रहा.
आता दूध छान उकळल्यावर त्यात साखर घाला.
उकळत्या दुधामध्ये तुरटी घ्याला. त्यामुळे दूध दही सारखे होऊ लागेल.
आता गाळणीने फाटलेले दूध गाळून घ्या. उरलेल्या साखरचे छान कॅरॅमल करा.
थोड्या वेळाने फाटलेल्या दुधाच्या मिश्रणात कॅरॅमल साखर घाला.
आता हे मिश्रण पुन्हा घट्ट होईपर्यंत मंद आचेवर ठेवा.
या मिश्रणात वेलची पावडर घाला आणि गॅस बंद ठेवा.
सारण हलक गरम असताना हाताला तूप लावून पेडा बनवून घ्या. या पेढ्याला ड्रायफ्रुट्सने सजवा.