Shreya Maskar
गुहागर बीच रत्नागिरी जिल्ह्यात आहे. हा महाराष्ट्रातील एक सुंदर आणि शांत समुद्रकिनारा आहे. हिवाळ्यात येथे नक्की भेट द्या.
गुहागर बीच कोकणातील पर्यटनाचे आकर्षण आहे. येथे मंदिरे, किल्ला आणि समुद्रकिनारे पाहायला मिळतात.
गुहागर बीच जवळ व्याडेश्वर मंदिर आणि दुर्गा देवी मंदिर आहे. तसेच काही अंतरावर चंडिका मंदिर, हेदवी येथील गणपती मंदिर देखील आहे.
गुहागरला ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. येथे गोपाळगड किल्ला वसलेला आहे. याला 'अंजनवेलचा किल्ला' असेही म्हणतात.
गुहागर बीच जवळ वेळणेश्वर बीच, बुधल बीच, पालशेत बीच हे समुद्रकिनारे आहेत. गुहागर बीच कोकणच्या सौंदर्यात भर घालतो.
गुहागर बीच निळेशार पाणी, स्वच्छ पांढरी वाळू आणि हिरवीगार वनराई यांसाठी ओळखला जातो.
गुहागर बीचवर बोटिंगचा आनंद घेऊ शकता. येथे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज होतात. येथे खाण्यापिण्याची राहण्याची उत्तम सोय आहे.
गुहागर बीचला जाण्यासाठी चिपळूण हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. तेथून बस किंवा टॅक्सीने गुहागरला पोहोचता येते.