Manasvi Choudhary
आज सर्वत्र मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा होत आहे.
गुढीपाडवा हा मराठी वर्षातील पहिला सण आहे.
साडेतीन मुहूर्तापैकी एक गुढीपाडवा हा सण आहे.
दाराभोवती गुढी उभारून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो.
मात्र तुम्हाला माहितीये का? गुढी उभारताना गुढीवर कलश उलटा का ठेवतात.
धर्मशास्त्रानुसार, तांब्याचा कलश गुढीवर उलटा ठेवल्याने तांब्याच्या कलशाच्य पोकळीतून तांब्यात असलेली कडुलिंबाची पाने आणि रेशमी वस्त्रे हे सात्विक लहरींनी भारीत बनते.
तसचे कलश गुढीवर उभारण्याआधी त्यावर स्वास्तिक काढावा.