Shreya Maskar
गुढीपाडव्याला गोड केशर श्रीखंड घरीच बनवा.
श्रीखंड बनवण्यासाठी दही, साखर, ड्रायफ्रूट्स, वेलची पूड, केशर, फूड कलर इत्यादी साहित्य लागते.
श्रीखंड बनवण्यासाठी सर्वप्रथम जाडसर दही कापड्यात बांधून ठेवा.
८-९ तासांनी दह्यातील पाणी पूर्णपणे काढून टाका.
दही एका भांड्यात काढून चांगले फेटून त्यात साखर मिक्स करा.
आता यात वेलची पूड, केशर आणि फूड कलर घालून एकजीव करा.
शेवटी यात कापलेले ड्रायफ्रूट्स घालून फ्रिजमध्ये १ तास थंड होण्यासाठी ठेवा.
गरमागरम पुरीसोबत श्रीखंडाचा आस्वाद घ्या.