Shreya Maskar
गुढीपाडव्याला मुंबईतील गिरगाव शोभायात्रा पाहण्यासाठी लोकांची येथे गर्दी पाहायला मिळते.
ढोल - ताशांचा गजर, लेझीम पथक यांच्यासोबत गुढीपाडवा उत्सव धुमधड्यात साजरा केला जातो.
पारंपरिक पोशाखात तरुण वर्ग येथे मोठ्या संख्येने पाहायला मिळतो.
येथे विशेषता महिला वर्ग नऊवारी पारंपरिक साडीमध्ये दिसतात.
नाकात नथ, डोळ्याला गॉगल आणि डोक्यावर रंगीबेरंगी फेटा घालून महिला वर्ग बुलेट चालवतात.
पारंपरिक रांगोळ्या आणि विविध कला येथे पाहायला मिळतात.
गिरगाव शोभायात्रा पाहण्यासाठी विदेशी पर्यटकही येतात.
महाराष्ट्रीयन संस्कृतीचे येथे दर्शन घडते.