Manasvi Choudhary
डोळ्यांच्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्या अनेकदा अचानक उद्भवतात, त्यापैकीच एक म्हणजे रांजणवाडी .
डोळ्यावर रांजणवाडी आली की पापणीवर गाठ किंवा पुरळ येते, तेव्हा डोळे लाल होणे, डोळ्याला तीव्र सूज येणे आणि पापणी ठणकणे किंवा तीव्र वेदना होणे हा त्रास होतो.
रांजणवाडीची सूज आणि वेदना झटपट कमी करण्यासाठी पेरूच्या पानांचा उपाय अत्यंत प्रभावी आहे.
झाडाची काही ताजी आणि कोवळी पेरूची पाने गोळा करून ती स्वच्छ पाण्यात पूर्णपणे धुवून घ्या.
एका भांड्यात थोडे पाणी घेऊन ते गॅसवर गरम करा. त्या गरम पाण्यात धुवून घेतलेली पेरूची पाने काही वेळ मिक्स करा.
५ मिनिटांनी पाणी उकळल्यानंतर पाने बाहेर काढा. आता ही कोमट पाने हळुवारपणे डोळ्यांवर किंवा रांजणवाडी आलेल्या भागावर ठेवा. पान थंड झाल्यानंतर पुन्हा दुसरे कोमट पान डोळ्यावर ठेवा.
उकळत्या पाण्यातून पाने काढल्यानंतर त्वचेला सहन होईल एवढाच शेक द्या.
सलग दोन दिवस दिवसातून ५ ते ६ वेळा हा उपाय केल्यास रांजणवाडीची सूज, लालसरपणा आणि तीव्र वेदना कमी होईल.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.