Green Leaf Benefits: 'या' झाडाची हिरवी पाने ठरतील चमत्कारीक! हिरव्या पानांचे सेवन करा अन् आजारांपासून दूर राहा

Dhanshri Shintre

झाडे–वनस्पती

आपल्या परिसरात अनेक झाडे–वनस्पती आढळतात, ज्यांची फळेच नव्हे तर पानेही आरोग्य सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर ठरतात.

पेरूची पाने

ही पेरूची पाने आहेत. रोज सकाळी उपाशीपोटी ही पाने चावून खाल्ल्यास शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. पुढे जाणून घ्या तपशील.

पचन सुधारण्यात मदत

पेरूच्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते, जे पचन सुधारण्यात मदत करते आणि पोटाच्या तक्रारी दूर करण्यास उपयुक्त ठरते.

हृदयविकार आजारांपासून संरक्षण

हृदयविकार आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षणासाठी पेरूची पाने उपयुक्त मानली जातात, कारण त्यात शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स असतात.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

पेरूच्या पानांमध्येही व्हिटॅमिन सी मुबलक असल्याने त्यांचे सेवन रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि शरीराला संक्रमणांविरुद्ध सक्षम बनवते.

हृदयस्वास्थ्य सुधारते

पेरूची पाने अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक जीवनसत्त्वांनी समृद्ध असतात, जी हृदयाला मुक्त रॅडिकल्सच्या हानीपासून संरक्षण देऊन हृदयस्वास्थ्य सुधारतात.

पाने चावून खा

सकाळी ताजी पेरूची पाने स्वच्छ धुऊन हळूवार चावा किंवा हीच पाने पाण्यात उकळून त्याचे काढा बनवून प्या, आरोग्यास फायदा होतो.

NEXT: कोरड्या हवेमुळे ओठ काळे पडतायेत? जाणून घ्या 'हे' घरगुती उपाय

येथे क्लिक करा