Saam Tv
हिरव्या पालेभाज्या किंवा कोणत्याही हिरव्या रंगाच्या भाज्या खाल्याने शरीराला फायदा होत असतो.
हिरव्या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शरीरासाठी आवश्यक पोषक तत्व असतात.
मात्र तुम्ही हिरव्या भाज्यासोबत लिंबू कधी खाल्लाय का?
तज्ज्ञांच्या मते हिरव्या भाज्यांसोबत लिंबू खाल्याने अनेक फायदे मिळतात.
लिंबू तुमच्या तब्येतीसाठी खूप फायदेशीर असतो. त्याने शरीर डिटॉक्स व्हायला मदत होते.
लिंबाचा समावेश आहारात केल्याने पचनसंस्था सुधारते. तसेच पोटाच्या समस्या दूर होतात.
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी सुद्धा असतं त्याने शरीराला ऊर्जा मिळते.
लिंबाचा सगळ्यात जास्त वापर अॅसिडीटी कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी होतो.