ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्या सर्वांना माहित आहे की ग्रीन टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
परंतु, दिवसभरात ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ कोणती, जाणून घ्या.
आपण ग्रीन टी पिण्याच्या वेळेबाबत अनेकदा चुका करतो. जर तुम्हाला ग्रीन टीचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल, तर तुम्हाला योग्य वेळ माहित असणे आवश्यक आहे.
तुम्ही ग्रीन टी कधीही पिऊ शकता. पण सकाळी आणि संध्याकाळी ग्रीन टी पिणे फायदेशीर ठरु शकते.
याशिवाय, रिकाम्या पोटी ग्रीन टी पिऊ नये.
तुम्ही नाश्त्यापूर्वी किंवा व्यायामानंतर ग्रीन टी पिऊ शकता.
झोपण्यापूर्वी ग्रीन टी पिणे टाळावे कारण यामुळे तुम्हाला झोप न येण्याची समस्या उद्भवू शकते.