Manasvi Choudhary
पैठणी साडी ही महिलांची विशेष आवड आहे. महिलांना पैठणी साडी नेसायला फाय आवडते.
लग्नकार्यात तसेच सणासुदीला पैठणी साडी उठून दिसते. पैठणी साडीमध्ये हिरव्या रंगाचे लेटेस्ट डिझाईन्स कोणते आहेत ते पाहूया.
गडद बॉटल ग्रीन रंगाची पैठणी साडी तुम्ही निवडू शकता. साडी आणि त्यावर लाल रंगाचा काठ साडीत उठून दिसतात
मोरनक्षी आणि मुनिया बॉर्डर पैठणी डिझाईनमध्ये साडीच्या पदरावर सुंदर रंगीबेरंगी मोर आणि कमळाची नक्षी डिझाईन असते.
आजकालच्या तरुण तरुणींमध्ये आणि महिलांमध्ये पोपटी रंगाची पैठणी खूप लोकप्रिय आहे. यावर गुलाबी किंवा नारंगी रंगाचा पदर आणि काठ उठून दिसतो.
बुट्टा आणि सोनेरी झरी वर्क असलेली पैठणी तुम्ही निवडू शकता. या साडीवर लहान-लहान सोनेरी अशरफी चांद किंवा मयुराचे बुट्टे विणलेले असतात. साडीचा संपूर्ण पदर झरी वर्क असतो.
ज्यांना जास्त रंगीबेरंगी काठ आवडत नाहीत, त्यांच्यासाठी साडी आणि काठ एकाच रंगात असणारी हिरव्या रंगाची पैठणी तुम्ही निवडू शकता.