Shruti Vilas Kadam
पारंपरिक लूकसाठी हिरव्या रंगाची पैठणी साडी सर्वोत्तम पर्याय आहे. मोर, कमळ आणि जरीच्या नक्षीमुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसते.
सोन्याच्या जरीकामासह बनारसी हिरवी साडी लग्नसमारंभ आणि सणांसाठी उत्तम ठरते. ही साडी परिधान केल्यावर रॉयल लूक मिळतो.
साधी पण एलिगंट दिसणारी सिल्क साडी कोणत्याही वयोगटातील महिलांना शोभून दिसते. हलक्या दागिन्यांसोबत ही साडी अधिक आकर्षक वाटते.
हलकी, स्टायलिश आणि ट्रेंडी असलेली ऑर्गेन्झा साडी सध्या फॅशनमध्ये आहे. फुलांच्या प्रिंट किंवा एम्ब्रॉयडरीसह ही साडी खूप सुंदर दिसते.
दक्षिण भारतीय स्टाइल आवडणाऱ्यांसाठी कांजीवरम हिरवी साडी उत्तम पर्याय आहे. तिचे जाड बॉर्डर आणि जरीकाम लूकला वेगळेपणा देतात.
पार्टी किंवा रिसेप्शनसाठी सीक्विन वर्क असलेली हिरवी साडी परफेक्ट आहे. चमकदार डिझाइनमुळे तुम्ही गर्दीतही उठून दिसू शकता.
फुलांच्या नक्षीकामाने सजवलेली हिरवी साडी मॉडर्न आणि फ्रेश लूक देते. डे फंक्शन, हळद किंवा कौटुंबिक कार्यक्रमांसाठी हा पर्याय योग्य ठरतो.