हिरव्या वटाण्यापासून बनवा कुरकुरीत थालीपीठ; चव लागेल एकदम भारी

Manasvi Choudhary

थालीपीठ

थालीपीठ हा हेल्दी आणि टेस्टी नाश्ता आहे. ज्वारी, बाजरी किंवा भाजणीचे थालीपीठचे प्रकार बनवले जाते. पण तुम्ही कधी हिरव्या वटाण्याचे थीलीपीठ खाल्ले आहे का?

Thalipeeth Recipe

सोपी रेसिपी

हिरव्या वटाण्याचे थालीपीठ घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवू शकता.

Thalipeeth Recipe

साहित्य

थालीपीठ बनवण्यासाठी हिरवे वटाणे, गव्हाचे पीठ, ज्वारी, बाजरीचे पीठ, बेसन, आलं- लसूण पेस्ट, कांदा, कोथिंबीर, जिरे, ओवा, पांढरे तीळ, हळद , हिंग, तेल हे साहित्य घ्या.

Healthy Breakfast Recipe

वाटाण्याची पेस्ट करा

सर्वातआधी हिरवे वाटाणे स्वच्छ धुवून घ्या. मिक्सरच्या भांड्यात हिरवे वाटाणे, हिरवी मिरची आणि जिरे याची पेस्ट करा. या मिश्रणात पाणी मिक्स करू नका.

Healthy Breakfast Recipe | google

मिश्रण मळून घ्या

एका मोठ्या परातीमध्ये गव्हाचे पीठ, ज्वारीचे, बाजरीचे पीठ आणि बेसन एकत्र मिक्स करा. त्यानंतर त्यात वाटलेले हिरव्या वाटाण्याचे मिश्रण टाका.

Healthy Breakfast Recipe

मसाले मिक्स करा

नंतर या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, आले-लसूण पेस्ट, ओवा, पांढरे तीळ, हळद, हिंग, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घाला. सर्व साहित्य चांगले एकत्र करून घ्या.

Spices | yandex

पीठ मळून घ्या

मिश्रणात थोडे पाणी मिक्स करून पीठ मऊ मळून घ्या पीठ मळल्यानंतर ५ मिनिटे बाजूला ठेवा.

Healthy Breakfast Recipe

थालीपीठ थापा

त्यानंतर एका प्लास्टिक पिशवीवर किंवा सुती रूमालावर चपातीप्रमाणे पिठाचा गोळा घ्या. त्यावर थोडे तेल किंवा पाणी लावा. पिठाचा गोळा हाताने थापून किंवा गोल फिरवून मध्यम जाडीचे थालीपीठ थापा.

Healthy Breakfast Recipe

थालीपीठ भाजून घ्या

तयार करा. थालीपीठाच्या मध्यभागी बोटाने लहान छिद्र पाडा आणि गॅसवर गरम तव्यावर तेल किंवा तूपामध्ये थालीपीठ भाजून घ्या.

Healthy Breakfast Recipe

NEXT : सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी प्यायल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या

Ajwain Water Benefits
येथे क्लिक करा...