Manasvi Choudhary
ओवा हा स्वयंपाकघरातील अत्यंत गुणकारी उपाय आहे. आयुर्वेदानुसार, ओव्याचा वापर औषधी गुणधर्मासाठी केला जातो.
पोटाच्या अनेक समस्यांवर ओवा हा घरगुती आणि रामबाण उपाय मानला जातो. पण जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याची सवय लावली, तर शरीरामध्ये अनेक सकारात्मक बदल होतात.
जर तुम्ही वजन वाढीच्या समस्येने त्रस्त असाल तर सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी प्या.
ओव्याचे पाणी प्यायल्याने शरीराचा मेटाबॉलिज्म वेगवान होतो, ज्यामुळे शरीरातील चरबी जलदगतीने लवकर जळण्यास मदत होते.
ओव्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. पावसाळ्यात ओव्याचे पाणी प्यायल्याने सर्दी, खोकला किंवा छातीत कफ या आजारांपासून आराम मिळतो.
रात्री एका ग्लासामध्ये पाणी घ्या त्यात ओव्याचे दाणे भिजत घाला.
सकाळी हे पाणी गाळून किंवा ओव्यासह कोमट करून रिकाम्या पोटी प्या.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.