Shreya Maskar
हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात मटार बाजारात येतात. त्यामुळे आपण आवर्जून मटार पुलाव, मटार हलवा, मटार भाजी , मटार पराठा असे अनेक पदार्थ बनवतो.
मटारपासून बनवलेले पदार्थ जेवढे चवदार लागतात. तेवढेच मटार सोलायला खूप कंटाळा येतो. कारण हे खूप किचकट काम आहे. मात्र याची सिंपल ट्रिप जाणून घेऊयात.
मटार सोलण्यासाठी सर्वप्रथम मटार मोठ्या पातेल्यात मीठ आणि पाणी टाकून मटार उकळवून घ्या. ५-१० मिनिटे गॅसवर ठेवा.
आता मटार गरम पाण्यातून काढून थोडे थंड झाल्यावर बर्फाच्या पाण्यात टाका आणि हाताने सहजरित्या मटार सोलता येतील.
गरम- थंड पाण्यामुळे मटारची साल मऊ पडून मटार सहजरित्या सोलता येतात. यासाठी वेळ कमी लागतो.
मटार सोलण्याची दुसरी पद्धत म्हणजे, मटार सोलण्याआधी किमान 2 तास तरी फ्रिजमध्ये ठेवा. जेणेकरून ते थंड होतील आणि झटपट साल निघतील.
ओली मटारची साले हाताने दाबली तरी सहजरित्या दाणे बाहेर येतात. ज्यामुळे किचकट काम लवकर होईल.
हिवाळ्यात मटार खरेदी करताना चांगल्या ठिकाणाहून खरेदी करा. मटारचे दाणे खराब असणार नाही याची काळजी घ्या.