Green Peas Cutlet: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा टेस्टी हिरव्या मटारचे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

2 कप हिरवे मटार (उकडलेले), 2 उकडलेले बटाटे, 1 हिरवी मिरची (बारीक चिरलेली), 1 टीस्पून आले-लसूण पेस्ट, ½ टीस्पून गरम मसाला, ½ टीस्पून लाल तिखट, ¼ टीस्पून हळद, 2 टेबलस्पून ब्रेडक्रम्ब्स, कोथिंबीर, मीठ चवीनुसार, तेल (शॅलो फ्रायसाठी)

Cutlet

मटार आणि बटाटे मॅश करा

उकडलेले मटार आणि बटाटे एका भांड्यात घेऊन चांगले मॅश करून एकजीव मिश्रण तयार करा.

Cutlet

मसाले मिसळा

त्यामध्ये हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, गरम मसाला, मीठ, कोथिंबीर आणि ब्रेडक्रम्ब्स घालून सर्व साहित्य नीट एकत्र करा.

Cutlet

कटलेटचा आकार द्या

तयार मिश्रणाचे समान भाग करून गोल किंवा अंडाकृती कटलेट तयार करा. हवे असल्यास बाहेरून ब्रेडक्रम्ब्स लावू शकता.

Cutlet Recipe

तव्यावर भाजा

तवा गरम करून त्यावर थोडे तेल घाला. तयार कटलेट दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करा.

Cutlet Recipe

गरमागरम सर्व्ह करा

कटलेट टोमॅटो सॉस, हिरवी चटणी किंवा दही डिपसोबत गरमागरम सर्व्ह करा. चहासोबत याची चव आणखी खुलते.

Cutlet Recipe | SAAM TV

परफेक्ट कटलेटसाठी टिप्स

कटलेट तुटत असल्यास थोडे कॉर्नफ्लोअर किंवा अतिरिक्त ब्रेडक्रम्ब्स घाला. अधिक पौष्टिक बनवण्यासाठी किसलेले गाजर, बीट किंवा पनीरही मिश्रणात घालू शकता.

Cutlet Recipe

Weight Loss Tips: तेच डाएट, तोच व्यायाम...; तरीही, महिलांच्या तुलनेत पुरुषांचे वजन लवकर का कसे होते?

Weigh Loss Tips | Saam tv
येथे क्लिक करा