Manasvi Choudhary
सकाळी नाश्त्याला काय बनवायचं असा प्रश्न महिलांना नेहमीच पडतो. तुम्हाला देखील हेल्दी आणि टेस्टी नाश्ता बनवायचा असेल तर मुगाचा डोसा ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता.
हिरव्या मुगाचा डोसा घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्या घरी ही रेसिपी ट्राय करू शकता.
भिजवलेले मुग, तांदूळ, कोथिंबीर, आलं, कढीपत्ता, मीठ, जीरे हे साहित्य घ्या.
सर्वातआधी एका भांड्यात मूग स्वच्छ धुवून भिजत घाला. मूग भिजल्यानंतर त्यातील पाणी गाळून घ्या. तांदूळ स्वच्छ धुवा.
मिक्सरच्या भांड्यात तांदूळ आणि डाळ बारीक पेस्ट करा. नंतर या मिश्रणात कोथिंबीर, कढीपत्ता पाने, हिरवी मिरची, जिरं आणि मीठ हे मिक्स करा.
संपूर्ण मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. डोश्याच्या बॅटरप्रमाणे पातळ पेस्ट तयार करा. गॅसवर गरम तव्यावर डोशाचे बॅटर गोलाकार पसरवा नंतर एका बाजून डोसा शिजल्यानंतर त्यावर तेल सोडा.
अशाप्रकारे घरच्या घरी मुगाच्या डाळीचा डोसा तयार होईल.