पोटावरची चरबी वाढणे म्हणजे फक्त लठ्ठपणा नाही; तर 'या' आजारांचा उद्भवू शकतो धोका

Manasvi Choudhary

लठ्ठपणा

बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लठ्ठपणा समस्या अनेकांना भिडसावत आहे.

Health Tips

गंभीर आजाराचे लक्षणं

लठ्ठपणामुळे अनेक गंभीर आजार डोकं वर काढतात. पोटावरची चरबी वाढणे हे सुद्धा गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, फॅटी लिव्हर आणि कर्करोग हे लठ्ठपणामुळे होते.

Belly fat warning signs

मधुमेह

पोटावर चरबी झाल्यामुळे शरीरातील इन्सुलिनच्या कार्यावर परिणाम होतो. यामुळे स्वादुपिंड रक्तातील साखर नियंत्रित करू शकत नाही आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

Diabetes | pinterest

उच्च रक्तदाब

कंबरेचा घेर वाढल्यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. पोटातील अतिरिक्त चरबीमुळे रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि रक्तदाब वाढू लागतो

High Blood Pressure

हृदयरोग आणि स्ट्रोक

पोटावरची चरबीमुळे खराब कोलेस्टेरॉल वाढते. हे कोलेस्टेरॉल हृदयाच्या धमन्यांमध्ये जमा होऊन ब्लॉकज निर्माण करू शकते, ज्यामुळे हार्ट अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक येण्याचा धोका वाढू शकतो.

Heart Disease & Stroke | saam tv

फॅटी लिव्हर

पोटावरची चरबी यकृतामध्ये जमा होऊ लागते. यालाच 'फॅटी लिव्हर' म्हणतात. योग्य वेळी यावर नियंत्रण न ठेवल्यास लिव्हर सिरोसिस सारखा गंभीर आजार होऊ शकतो.

non alcoholic liver disease

कर्करोग

पोटावरील अतिरिक्त चरबीमुळे शरीरात सातत्याने सूज येते. यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते, ज्यामुळे महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक वाढतो.

Cancer Symptoms

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: रात्री झोपण्यापूर्वी करा ही 5 योगासने, दिवसभराचा थकवा होईल दूर आणि शांत झोप लागेल

येथे क्लिक करा...