Shreya Maskar
हिरव्या मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी हिरवी मिरची, शेंगदाणे, लसूण, तेल, जिरे, मीठ आणि लिंबाचा रस इत्यादी साहित्य लागते.
हिरव्या मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी सर्वप्रथम हिरव्या मिरच्यांचे देठ काढून मिरची स्वच्छ पाण्याने धुवून घा.
त्यानंतर मिरच्यांचे बारीक तुकडे करून घ्यावे.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे भाजून घ्यावे.
त्यानंतर पॅनमध्ये लसूण आणि शेंगदाणे देखील खरपूस भाजून घ्यावे.
सर्व मिश्रण थंड झाल्यावर खलबत्त्यात चांगले ठेचा.
अशाप्रकारे झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा तयार झाला आहे.
गरमागरम चपाती आणि भाकरीसोबत हिरव्या मिरचीच्या ठेचाचा आस्वाद घ्या.