Saam Tv
अनेक घरांमध्ये तुम्ही पाहिलं असेलच की जेवणासोबत मिरची खाल्ली जाते. त्याशिवाय जेवणाचं ताट अपुर्ण वाटतं.
तुम्हाला माहितीये का मिरचीमध्ये असे अनेक औषधी गुणधर्म आहेत.
मिरचीमध्ये ए, बी, के, बी६, पोटॅशियम आणि तांबे असे अनेक आवश्यक घटक असतात.
हिरव्या मिरचीमध्ये भरपूर अॅंटीऑक्सिडेंट्स असतात. त्याने कर्करोगाचा धोका टाळता येतो.
हिरवी मिरची रक्तातील खराब कोलेस्ट्रोल कमी करते.
मिरच्यामध्ये असलेल्या गुणधर्म आणि जीवनसत्वांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
मधुमेहींसाठी हिरव्या मिरचीतील घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.