Green vs Red Apple : लाल की हिरवं? रोज कोणतं सफरचंद खाणं आरोग्यासाठी फायदेशीर?

Shreya Maskar

हिरवं सफरचंद खाण्याचे फायदे

हिरवं सफरचंद चवीला किंचित आंबट आणि ताजेतवाने असतं. त्यात फायबर आणि विविध अँटिऑक्सिडंट्स असतात.

Benefits of eating green apple | pinterest

मधुमेह

हिरवं सफरचंद खाल्ल्याने साखरेचे शोषण तुलनेने हळू होऊ शकते. त्यातील फायबर आतड्यांचे आरोग्य आणि नियमित मलविसर्जन राखण्यास मदत करते.

Diabetes | pinterest

लाल सफरचंद खाण्याचे फायदे

लाल सफरचंद चवीला अनेकदा अधिक गोड असतं. त्याच्या सालीतील लाल रंग हा अँथोसायनिन्ससारख्या वनस्पतीजन्य रंगद्रव्यांमुळे असतो. लाल सफरचंदातील फायबर आतड्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

red apples | pinterest

हृदयाचे आरोग्य

हेल्दी हार्टसाठी लाल रंगाचे सफरचंद खा. त्यातील फायबर आणि पॉलीफेनॉल्स संतुलित आहाराचा भाग हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.

Heart health | pinterest

वजन कमी करणे

वजन कमी करण्यासाठी दोन्ही प्रकारची सफरचंद फायदेशीर ठरतात. यात कॅलरी कमी असतात. सफरचंदाचा ज्यूस करण्याऐवजी संपूर्ण फळ खा.संपूर्ण सफरचंद खाल्ल्याने फायबर मिळते आणि पोट भरल्यासारखे वाटते.

Lose weight | pinterest

सफरचंद खाताना कोणती काळजी घ्यावी?

सफरचंद खाण्यापूर्वी वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुवा.शक्य असल्यास सालासकट खा; सालीत भरपूर फायबर असते.

eating apples | pinterest

हिरवं की लाल सफरचंद?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दोन्ही सफरचंदं आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. वजन नियंत्रणासाठी हिरवं सफरचंद निवडू शकता, तर लाल सालीतील अँथोसायनिन्सचा फायदा मिळू शकतो.

Green or red apple | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

Lips Care | AI PHOTO
येथे क्लिक करा...