Surabhi Jayashree Jagdish
हळदी-कुंकवाच्या वाणात वस्तू निवडताना परंपरेला महत्त्व दिलं जातं. १० ते ५० रुपयांच्या बजेटमध्येही अनेक प्रकारच्या उपयुक्त आणि आकर्षक वस्तू देता येतात. यंदाच्या हळदी कुंकवामध्ये तुम्ही काय देऊ शकता ते पाहूयात.
हळद-कुंकूची छोटी डबी देता येते. कुंकवाची टिकली, छोटा कंगवा किंवा सेफ्टी पिनही चांगला पर्याय आहे.
वाणात कापडी रुमाल किंवा साधा नॅपकिनही देता येतो. सणाची गोडी आणि उपयोगिता दोन्ही जपली जातात.
प्लास्टिकची छोटी वाटी, डबा देता येतो. किचनमध्ये वापरता येणारा पीलर किंवा चहाची गाळणीही पर्याय आहे.
किचन टॉवेल, पुसणी किंवा सुती रुमालही तुम्ही वाणात देऊ शकता. याशिवाय अगरबत्तीचे पुडेही देता येतात. हे थोडं उपयुक्त वाण ठरतं.
छोटी पणती किंवा मेणबत्ती देता येते. याशिवाय डब्यात घालायचा चमचा चांगला पर्याय आहे.पूजा आणि घरगुती वापर दोन्हीसाठी उपयोगी ठरतं.
स्टीलचा छोटा डबा, वाटी-चमचा सेट किंवा किचन कंटेनर देता येतो. त्याचप्रमाणे एखादं चांगलं शोपीस देखील तुम्ही देऊ शकता.