Surabhi Jayashree Jagdish
पावसात कार बंद पडली तर सर्वात आधी घाबरू नका आणि वारंवार कार स्टार्ट करण्याचा प्रयत्न करू नका. असं केल्याने इंजिनवर अधिक ताण येऊ शकतो. शांतपणे परिस्थिती तपासून मग पुढची पावले उचला.
पावसामुळे अनेकदा बॅटरीच्या कनेक्शनमध्ये ओलावा जातो किंवा वायर सैल होतात.
त्यामुळे कार स्टार्ट होण्यात अडचण येऊ शकते. म्हणून बॅटरीचे कनेक्शन व्यवस्थित तपासणं गरजेचं आहे.
इंजिनमध्ये किंवा एअर फिल्टरमध्ये पाणी गेले आहे का हे नक्की पाहा. जर इंटेकमध्ये पाणी शिरले असेल तर कार स्टार्ट करू नये. यामुळे इंजिनचं मोठं नुकसान होऊ शकतं.
स्पार्क प्लग ओले झाले असतील तर ते कोरड्या कपड्याने नीट पुसून घ्या.
ओलाव्यामुळे स्पार्क योग्य प्रकारे तयार होत नाही. स्पार्क प्लग सुकवल्यानंतर कार पुन्हा स्टार्ट होण्याची शक्यता वाढते.
इग्निशन वायरमध्ये पावसाच्या ओलाव्यामुळे शॉर्ट सर्किट होऊ शकते. त्यामुळे वायर व्यवस्थित आहेत का हे एकदा तपासून घ्या. छोटासा प्रॉब्लेम कार सुरू न होण्याचं कारण ठरू शकतो.
ओला एअर फिल्टर इंजिनला आवश्यक हवा मिळू देत नाही. त्यामुळे कार सुरू होण्यात अडथळा निर्माण होतो. एअर फिल्टर बाहेर काढून तो पूर्णपणे सुकवणे फायदेशीर ठरते.
कार स्टार्ट करताना गिअर नेहमी न्यूट्रलमध्ये ठेवा. यामुळे इंजिनवर अतिरिक्त दबाव येत नाही आणि कार पटकन सुरू होऊ शकते. तसंच पावसाळ्यापूर्वी कारची सर्व्हिसिंग करून घेतल्यास अशा समस्या टाळता येतात.