ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गुगलने त्यांच्या ट्रान्सलेट प्लॅटफॉर्मवर AI- पावर्ड लाइव्ह ट्रान्सलेशन फीचर सुरू केले आहे. या फीचरद्वारे तुम्हाला केवळ भाषांतरच मिळणार नाही तर नवीन भाषा शिकण्याची संधी देखील मिळणार आहे.
गुगल ट्रान्सलेट आता तुमच्यासाठी शिक्षकासारखे काम करेल. या फिचरमुळे गुगल duolingo सारख्या अॅप्सला थेट टक्कर देणार आहे.
यूजर आपल्या भाषेच्या ज्ञानाप्रमाणे बेसिक ते अॅडव्हान्स्ड पर्यंत शिकू शकतात. त्यानंतर अॅप तुमच्या लेव्हल आणि ध्येयांनुसार आपोआप ऐकणे आणि बोलण्याचा प्रॅक्टीस सेशंस तयार करेल. यामध्ये युजर्स सुमारे ४० भाषा शिकू शकतात.
समजा अॅप तुम्हाला जेवणाची वेळ विचारण्यासाठी प्रॉम्प्ट देतो. याशिवाय, तुम्ही सिम्युलेटेड संभाषण ऐकू शकता आणि टॅप करून योग्य शब्द निवडू शकता. याशिवाय, तुम्ही स्वतः बोलून सराव करू शकता, ज्यामध्ये अॅप तुम्हाला सूचना देखील देईल.
सध्या हे फिचर बीटा वर्जनमध्ये उपलब्ध आहे. सुरुवातीला इंग्रजी भाषिक स्पॅनिश आणि फ्रेंच शिकू शकतात. तर स्पॅनिश, फ्रेंच आणि पोर्तुगीज भाषिक इंग्रजी शिकू शकतात.
सर्वप्रथम, तुमच्या मोबाईलवर गुगल ट्रान्सलेट अॅप उघडा. येथे तुम्हाला practice चा पर्याय दिसेल. यानंतर, तुमची स्कील लेव्हल आणि गोल्स सेट करा. यानंतर तुम्ही भाषा शिकण्यास आणि लाइव्ह ट्रान्सलेशन वापरु शकता.
या नवीन फिचरमध्ये गुगलने त्यांचे जेमिनी एआय मॉडेल समाविष्ट केले आहे, ज्यामुळे भाषांतर आणखी अचूक झाले आहे. आता हे अॅप अनेक भाषा जसे की हिंदी, तमिळ, अरबी, फ्रेंच आणि स्पॅनिश यांना सपोर्ट करते.