WhatsApp Calling: इंटरनेटशिवायही व्हॉट्सॲप कॉलिंगची सुविधा, 'या' स्मार्टफोनमध्ये आहेत भन्नाट फिचर्स

Dhanshri Shintre

गुगल पिक्सेल १० सिरीज

गुगल पिक्सेल १० सिरीज स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना इंटरनेटशिवाय व्हॉट्सॲप वापरण्याची सुविधा मिळणार आहे. हे नवे फीचर लवकरच सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी

गुगल पिक्सेल १० सिरीजमध्ये सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीचा समावेश करण्यात आला आहे. हे फीचर आधीपासूनच काही फोनमध्ये उपलब्ध असले तरी त्याचा वापर मर्यादितच राहिला आहे.

SOS अलर्ट

आतापर्यंत सॅटेलाइट सपोर्ट असलेल्या फोनवर फक्त SOS अलर्ट आणि लोकेशन शेअरिंग शक्य होतं, पण आता गुगलने व्हॉट्सॲप कॉलिंगची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.

नवे फीचर

गुगलने एक्सवर व्हिडिओ शेअर करत नवे फीचर जाहीर केले आहे, ज्यामध्ये सॅटेलाइट कनेक्शनच्या मदतीने व्हॉट्सॲप कॉलिंग सहजतेने कार्यरत असल्याचे दाखवले गेले आहे.

लाईव्ह लोकेशन

गुगलने यापूर्वी मॅप्स आणि फाइंड माय हबमध्ये सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीचा पर्याय दिला होता, ज्यामुळे यूजर्सना लाईव्ह लोकेशन शेअर करण्याची सुविधा मिळाली होती.

कॉलिंगची सुविधा

गुगल पिक्सेल १० सिरीजमध्ये यूजर्सना सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीवर व्हॉट्सॲप कॉलिंगची सुविधा मिळणार आहे, मात्र या सेवेसाठी काही अटी लागू असणार आहेत.

अतिरिक्त शुल्क

गुगलने स्पष्ट केले आहे की हे फीचर फक्त काही निवडक नेटवर्क्ससोबत उपलब्ध राहील आणि त्याचा वापर करण्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.

भारतामध्ये उपलब्ध नाही

भारतामध्ये हे फीचर उपलब्ध नसेल, मात्र या सुविधेमुळे गुगलला ॲपल आणि इतर स्मार्टफोन ब्रँड्सवर तांत्रिक आघाडी मिळण्याची संधी मिळणार आहे.

आयफोन

आयफोनमध्ये सध्या सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीद्वारे केवळ SOS अलर्ट सुविधा दिली जाते, तर सॅमसंग गॅलेक्सी S25 सीरिजमध्ये मेसेजिंगसाठीही सपोर्ट उपलब्ध आहे.

NEXT: 'या' चूका केल्यास तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट बॅन होऊ शकते, जाणून घ्या नियम

येथे क्लिक करा