Surabhi Jayashree Jagdish
तुम्ही नीट गुगल पाहिलं असेल तर तुम्हाला समजेल की गुगलने त्यांचा लोगो बदलला आहे. कंपनीने रंगीबेरंगी 'G' आयकॉन पुन्हा एकदा रिफ्रेश केला आहे.
जवळपास एका दशकानंतर गुगलने हे व्हिज्युअल अपडेट केलं आहे.
जुन्या आयकॉनवर चार वेगवेगळे रंग म्हणजेच निळा, लाल, पिवळा आणि हिरवा या ब्लॉकमध्ये G अक्षर दिसत होतं.
नवीन आयकॉन आता पूर्वीसारख्या चार रंगांऐवजी ग्रेडियंट शैलीमध्ये दिसतो.
9to5Google च्या अहवालानुसार, गुगलच्या लोगोचं हे अपडेट सध्या गूगल सर्च ॲपद्वारे आयओएस युजर्ससाठी आणलं जाणार आहे.
हा बदल प्रामुख्याने iOS आणि पिक्सेल डिव्हाइसवर दिसतोय. तर वेब आणि इतर Android डिव्हाइसवर जुना लोगो अजूनही वापरला जातोय.
गुगलने यापूर्वी 2015 मध्ये आपला ‘G’ लोगो बदलला होता.