Dhanshri Shintre
गुगलने अनेक सेवा दिल्या आहेत, पण आता त्याचा लोकप्रिय URL Shortener टूल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे टूल लांब URL छोटं करून इतर प्लॅटफॉर्मवर लिंक्स सोप्या पद्धतीने शेअर करण्यास मदत करतं.
गुगलने 2018 मध्ये URL Shortener बंदीची घोषणा केली होती आणि गेल्या वर्षी लहान केलेल्या लिंक्स लवकरच काम करणार नाहीत, असे जाहीर केले आहे.
गुगलची URL Shortener सेवा (goo.gl) २५ ऑगस्ट २०२५ पासून बंद होईल, आणि यूजर्स ही सेवा वापरू शकणार नाहीत, अशी कंपनीने माहिती दिली आहे.
२५ ऑगस्टनंतर goo.gl लिंक काम करणार नाहीत आणि वापरकर्त्यांना ४०४ एरर पेज दिसेल.
गुगलच्या मते, गेल्या काही वर्षांत Google URL Shortener सेवेशी संबंधित ट्रॅफिकमध्ये मोठी घट झाली आहे.
कंपनीने सांगितले की जून २०२४ मध्ये ९९% लिंक्सवर कोणतीही क्रिया झालेली नाही, म्हणजे वापर फारच कमी आहे.
गुगलने स्पष्ट केले की मॅप्ससारख्या अॅप्समधून जनरेट झालेल्या goo.gl लिंक्स २५ ऑगस्ट नंतरही लोकेशन शेअरिंगसाठी कार्यरत राहतील.
ऑगस्ट 2025 पासून Android 8 (Oreo) आणि Android 9 (Pie) वर चालणाऱ्या मोबाइल डिव्हाइसेससाठी Chrome ब्राऊजरचे सपोर्ट थांबवले जाईल.