Sakshi Sunil Jadhav
नव्या वर्षात Jioने त्यांच्या युजर्ससाठी धमाकेदार ऑफर्स आणल्या आहेत. याने ग्राहकांना सगळ्यात जास्त रिचार्जचे पर्याय मिळाले आहेत.
प्रत्येकजण त्याच्या सोयीनुसार रिचार्ज करतो. काहीजण महिन्याला, वर्षाला, किंवा ३ ते ६ महिन्यांचा रिचार्ज करतात.
तुम्हाला नव्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान मिळणार आहेत. जे सगळ्यात स्वस्त असणार आहेत. पुढे आपण अशाच एका धमाकेदार प्लानबद्दल जाणून घेणार आहोत.
पुढे आपण नव्या सगळ्यात कमी किमतीचा म्हणजेच ७५ रुपयांच्या रिचार्ज प्लानबद्दल जाणून घेणार आहोत. जो सगळ्यात खास असणार आहे.
७५ रुपयांच्या हा प्लान तब्बल २३ दिवसांच्या वैधतेचा असणार आहे. यामध्ये तुम्हाला २.५ जीबी डेटा मिळणार आहे. दिवसाला तुम्हाल १०० एमबी आणि २०० एमबी अॅडीशनल डेटा ऑफर मिळणार आहे.
तुम्हाला यामध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंग मिळेल. सोबत ५० एसएमएसची मुभा मिळेल. म्हणजेच ७५ रुपयात तुम्हाला २३ दिवस एसएमएस, डेटा आणि कॉलिंग्सचा फायदा घेता येईल.
जेव्हा तुमचा डेटा संपेल तेव्हा नेटचा स्पीड ६४केबीपीएस होईल. सोबत तुम्हाला Jio Tv आणि ai क्लाउडचा अॅक्सेस मिळेल.
हा संपूर्ण प्लान फक्त JioPhone युजर्ससाठी असणार आहे. सामान्य युजर्स याचा लाभ घेऊ शकत नाहीत.