Priya More
उन्हाळा सुरू झाला असून शीतपेयांना खूप चांगली पसंती दिली जाते.
उकाड्यामुळे हैराण झालेले लिंबू सरबत, कोकम सरबत, आवळ्याचा सरबत पितात.
डिंकाचा ज्यूस आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असून तो उन्हाळ्यात पिणे फायदेशीर राहते.
डिंकाचा ज्यूस बनवण्यासाठी ५ ते ६ डिंक रात्रभर एक वाटी पाण्यामध्ये भिसत घाला.
अर्धा वाटी सबजा एक वाटी पाण्यामध्ये एका तासासाठी भिजत ठेवा.
एक वाटी पुदीनाची पानं, एक वाटी गूळ, जिरे पावडर एक चमचा, एक चमचा काळे मीठ घ्या.
मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदीना, गूळ, जिरे पावडर, काळ मीठ थोडे पाणी टाकून बारीक करून घ्या.
एका पातेल्यामध्ये २ लिटर थंड पाणी घ्या त्यामध्ये हे मिश्रण टाका. त्यानंतर त्यामध्ये भिजवलेला डिंक आणि सबजा टाका.
त्यानंतर या मिश्रणामध्ये बर्फाते तुकडे आणि एका लिंबाचा रस टाका आणि व्यवस्थित हालवून घ्या.
डिंकाचा ज्यूस लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण पिऊ शकतात. हा ज्यूस खूपच टेस्टी लागतो.