ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतात दिवसेंदिवस सोन्याची किंमत वाढत चालली आहे. सध्या भारतात १० ग्रॅम सोन्यासाठी 97,865 रूपये मोजावे लागतात. परंतु तुम्हाला माहीत आहे का, काही देशांमध्ये सोनं भारतापेक्षाही स्वस्त मिळतं, हे देश कोणते, जाणून घ्या.
बहरीन देशात प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ३५९ बहरीन दिनार म्हणजेच ८३, ०८५.५ रूपये आहे.
कुवेतमध्ये प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत २९१.१ कुवेती दिनार म्हणजेच 82,421.48 रूपये आहे.
मलेशियामध्ये १० ग्रॅम सोन्याची किंमत ८३,५१६ रूपये आहे.
ओमान देशामध्ये प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ३६९ ओमेनियन रियाल आहे. भारतीय रूपयांमध्ये याची किंमत ८३,२९६ आहे.
जगातल्या श्रीमंत देशांमध्ये गणल्या जाणाऱ्या कतार या देशामध्ये १० ग्रॅम सोन्याची किंमत ८७,७७० रूपये आहे.
सौदी अरेबियामध्ये प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ३,५९० सौदी रियाल, म्हणजेच ८३,४८५.२२ रुपये इतकी आहे.
दुबईमध्ये अनेकजण सोनं खरेदीसाठी जातात. दुबईमध्ये २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ३,५०७.४, AED म्हणजेच ८३,२९२.६५ रूपये आहे.