ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
डायबिटीज हा आजार रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने होते. अशावेळी गोड न खाण्याचा सल्ला दिला जातो.
डायबिटीजच्या रुग्णांना अनेकदा गोड खाण्याची इच्छा होते. यासाठी काहीजण जेवणामध्ये किंवा पेयामध्ये लोक शुगर फ्रि पावडर, गोळ्या किंवा लिक्विडचा वापर करतात.
काही जण चहामध्ये साखरेऐवजी शुगर फ्रि गोळ्या घालून चहा पितात. परंतु तुम्हाला माहीत आहे का, याचा आरोग्यावर काय परिणाम होतो. जाणून घ्या.
अधिक काळापर्यंत आर्टिफिशियल स्वीटनर्स म्हणजेच शुगर फ्रि गोळ्या खाल्ल्याने कॅन्सर होण्याचा धोका अधिक वाढतो.
शुगर फ्रि गोळ्या जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढते.
डायबिटीजचे रुग्ण जर शुगर फ्रि गोळ्यांचे सेवन करत असतील तर, यामुळे त्यांना भूख न लागण्याची समस्या होऊ शकते.
शुगर फ्रि गोळ्या हृदयासाठी घातक असतात. यामुळे हृदयाशी संबधित आजार होऊ शकतात.