Manasvi Choudhary
रक्षाबंधननिमित्त बहिणीसाठी सोन्याचे गीफ्ट द्यायचा विचार असेल तर तुम्ही साधे आणि हलके सोन्याचे कानातले निवडू शकता.
मिनिमल आणि एलिगंट डिझाईन्स तुम्ही निवडू शकता. ज्या रोजच्या वापरासाठी बेस्ट ऑप्शन आहे.
लहान फुलांच्या आकाराचे सोन्याचे बारीक स्टड्स कानात घालायला अतिशय हलके आणि गोड दिसतात. वेस्टर्न किंवा इंडियन अशा दोन्ही लूकवर उठून दिसतात.
सोन्याच्या छोट्या डिझाईनला लागून एक छोटा पांढरा मोती असलेले कानातले निवडू शकता.
वर्तुळ, त्रिकोण किंवा चौकोनी आकारात असणारे मिनिमलिस्ट सोन्याचे स्टड्स ऑफिस किंवा कॉलेजमध्ये जाणाऱ्या महिलांसाठी किंवा मुलींसाठी अगदी परफेक्ट आहेत.
जर बहिणीला थोडे पारंपरिक दागिने आवडत असतील, तर अतिशय वजनाने हलके असणारे छोटे सोन्याचे झुमके कानातले रोजच्या वापरासाठी कम्फर्टेबल आहेत.
कानात सहज घालता येणारी आणि कधीही फॅशनच्या बाहेर न जाणारी साधी सोन्याची लहान रिंग किंवा हूप्स डिझाईन दिसायला खूप स्टायलिश वाटते.