Manasvi Choudhary
आजकाल कोरियन आणि जपानी स्किनकेअर रूटीनचा ट्रेंड सुरू आहे. काचेसारखी ग्लोईंग स्किन मिळवण्यासाठी अनेक महिला व मुली या स्किनकेअर टिप्स फॉलो करतात.
मात्र, या दोन्हींमध्ये नेमका काय फरक आहे आणि तुमच्या त्वचेसाठी कोणती स्किनकेअर रूटीन बेस्ट ठरेल, हे माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे.
कोरियन स्किनकेअर मुख्यत्वे त्वचेला आतून खोलवर पोषण देते यामुळे त्वचेवर ग्लो येतो.
कोरियन स्किनकेअर रूटिनमध्ये डबल क्लिन्झिंग, टोनिंग, एसेन्स, सीरम, शीट मास्क, आय क्रीम, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन या स्टेप्स क्रमाने फॉलो केल्या जातात.
जर तुम्हाला हायड्रेटेड, चमकदार आणि अतिशय गुळगुळीत त्वचा हवी असेल, तर तुम्ही कोरियन स्किनकेअर रूटीन निवडू शकता.
जपानी स्किनकेअर पद्धत कोरियन रूटीनपेक्षा थोडी वेगळी आणि साधी असते. यामध्ये त्वचा निरोगी, नैसर्गिकरीत्या स्वच्छ होते.
जपानी स्किनकेअर रूटीनमध्ये डबल क्लिन्झिंग, जपानी लोशन, सीरम आणि मॉइश्चरायझर या स्टेप्स फॉलो केल्या जातात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.