Manasvi Choudhary
लग्न झालेल्या महिलांच्या दागिन्यांमध्ये मंगळसूत्रानंतर कानातल्यांना विशेष महत्व असते.
मात्र आजकाल महिलांना खूप जड आणि मोठे दागिने घालण्याऐवजी हलके स्टायलिश आणि मॉडर्न डिझाईन्सचे कानातले घालायला आवडतात यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोप्या डिझाईन्स सांगणार आहोत.
ऑफिसवेअरसाठी किंवा डेली वेअरसाठी तुम्ही खास छोटे सोन्याचे स्टड्स निवडू शकतात. हे कानातले वजनाला अत्यंत हलके असतात.
फुलांच्या किंवा पानांच्या बारीक नक्षीकाम केलेले सोन्याचे कानातले तुम्ही निवडू शकता. हे कानातले वेस्टर्न आणि एथनिक दोन्ही लूकवर उठून दिसतात.
सोन्याच्या कानातल्यांवर लहान-लहान मोत्यांचे वर्क केलेले कानातले रॉयल लूक देतात. सण-समारंभ किंवा पारंपरिक कार्यक्रमांसाठी हे कानातले एकदम बेस्ट आहेत.
वेस्टर्न किंवा इंडो-वेस्टर्न आऊटफिटवर घालण्यासाठी सोन्याच्या डिझायनर रिंग्स तुम्ही निवडू शकता जे युनिक दिसतात.