Manasvi Choudhary
हिंदू धर्मात सोन्याला विशेष महत्व आहे. फार पूर्वीपासून महिला गळ्यात, कानात किंवा हातात सोन्याचे दागिने घालतात.
मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? महिला पायात सोन्याचे दागिने का घालत नाही. यामागचे नेमके कारण काय आहे ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
हिंदू धर्मशास्त्रानुसार, सोने हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते म्हणून पायात सोने घालत नाही..
सोने घालण्याची फार पूर्वीपासून परंपरा आहे. सोने शरीराच्या वरच्या भागात परिधान केले जाते.
शरीरात उष्णता आणि ऊर्जा असते. विज्ञान आणि आयुर्वेदानुसार, सोने शरीरात उष्णता वाढवते, तर चांदी शरीराला थंड ठेवण्यास मदत करते.
पायात चांदीचे दागिने परिधान केल्याने शरीराच्या पायांच्या नसांना आराम मिळतो आणि पायांची जळजळ कमी होण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.