Manasvi Choudhary
तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? की केसांचा रंग हा काळाच का असतो?
केसांचा रंग काळा असण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. ते या वेबस्टोरीतून समजून घ्या.
केसांचा रंग काळा असण्यामागे 'मेलॅनिन' नावाचे नैसर्गिक रंगद्रव्य महत्वाचे आहे.. मेलॅनिन हे त्वचेतील आणि केसांच्या मुळाशी असणाऱ्या 'मेलॅनोसाइट्स' नावाच्या पेशींद्वारे तयार होते.
मेलॅनिनचे युमेलॅनिन आणि फिओमेलॅनिन हे दोन प्रकार असतात. युमेलॅनिन यामुळे केस आणि डोळ्यांना काळा किंवा गडद तपकिरी रंग मिळतो तर फिओमेलॅनिन यामुळे केस किंवा त्वचेला लाल किंवा पिवळसर छटा मिळते.
ज्या लोकांच्या शरीरात युमेलॅनिनचे प्रमाण खूप जास्त असते, त्यांचे केस नैसर्गिकरित्या काळे किंवा गडद तपकीरी असतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.