Tanvi Pol
जून महिना सुरु होण्यापूर्वीच अनेकजण ट्रेकिंगला जात असतात.
महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने पर्यटक सह्याद्री पर्वतरांगेत असलेल्या कळसुबाई ट्रेकसाठी जातात.
जर तुम्हीही तिथे जात आहात तर काजवा महोत्सव पाहण्यासाठी विसरु नका.
याहीवर्षी २५ मे ते १५ जून या कालावधीत काजवा महोत्सव होणार आहे.
कळसूबाई, हरिश्चंद्र अभयारण्य, भंडारदरा, राजमाची, माळशेज घाट, भीमाशंकरसह अशा विविध ठिकाणी या महोत्सवाचे आजोयन करण्यात येते.
काजव्यांची जत्रा म्हणजे केवळ एक नजारा नाही, तर निसर्गाशी जोडलेली एक आत्मिक अनुभूती आहे.
तुम्हीही तुमच्या कुटुंबियांसोबत नक्की भेट द्या.