Shreya Maskar
रोज काय डब्याला बनवायचे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर घरी असलेल्या कोबीपासून झणझणीत कोबीचा पराठा बनवा आणि मुलांना नाश्त्याला आणि टिफिनला द्या.
कोबी पराठा बनवण्यासाठी कोबी, आलं-मिरची-लसूण पेस्ट, धने -जिरे पावडर, मीठ, हिंग, हळद , मैदा, कोथिंबीर, गव्हाचे पीठ इत्यादी साहित्य लागते.
कोबी पराठा बनवण्यासाठी कोबी स्वच्छ धुवून बारीक किसून घ्यावी. त्याचे पाणी काढून थोडा वेळ एका ताटात पसरवून ठेवून द्या.
एका बाऊलमध्ये किसलेला कोबी, आलं-मिरची-लसूण पेस्ट, धने -जिरे पावडर, हिंग, हळद, चिरलेली कोथिंबीर, मीठ घालून चांगले मिक्स करा.
यात थोडे गव्हाचे पीठ, मैदा मिक्स करा आणि चांगली मऊसूत कणिक मळून घ्या. तुम्ही यात थोडे तेल किंवा तूप टाका. जेणेकरून पराठे मऊ होतील.
त्यानंतर पीठाचे छोटे गोळे करून पराठे गोल लाटून घ्या. तुम्हाला आवडेल त्या आकाराचे बनवा. जेणेकरून मुलं आवडीने टिफिन खातील.
पॅनला तूप लावून कोबी पराठा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. पराठा भाजताना गॅस मध्य आचेवर ठेवा. तसेच पराठ्याला तूप लावा.
गरमागरम कोबी पराठ्याचा तूप, लोणचे, खोबऱ्याची चटणी, पुदिना चटणी, सॉस यांच्यासोबत आस्वाद घ्या. लहान मुलांना हा पदार्थ खूप आवडेल.