Saam Tv
१ किसलेला कोबी, १ किसलेले गाजर, कांद्याची पात, हिरव्या मिरच्या, ३ चमचे मैदा, कॉर्नफ्लोअर,मीठ, काळी किंवा पांढरी मिरी पावडर , तेल इत्यादी.
शिमला मिरची, कांदा, लसूण पाकळ्या, आलं, सोया सॉस, लाल मिरची सॉस, कॉर्नफ्लोअर, पॅकेट मंचुरियन मसाला.
सर्वप्रथम किसलेला कोबी, गाजर, आलं, मिरची आणि कॉर्नफ्लोअर एका भांड्यात मिक्स करा.
पुढे त्यात मैदा, मिरपूड, मीठ लावून चांगलं चमच्याने मिक्स करा. आता तयार पिठाचे हाताला तेल लावून गोळे करा.
मंचुरीयन चांगले कुरकुरीत आणि सोनेरी तपकीरी होईपर्यंत तयार करा.
आता दुसऱ्या कढई तेल घाला. त्यात आलं,लसुण, कांदा, शिमला मिर्ची आणि कांद्याची पात १ मिनिट भर परतून घ्या.
पुढे त्यात सॉस आणि तयार मंचुरियन घालून मिक्स करा. आता त्यात कॉर्नफ्लोअरचे पाणी घाला आणि गरमा गरम मंचुरियन सर्व्ह करा.