Surabhi Jayashree Jagdish
पावसाळा सुरु झाला असून तुम्ही या विकेंडला खास गोव्याजवळ फिरण्यासाठी ठिकाण शोधताय का?
गोव्याच्या जवळ असलेलं आणि पावसाळ्यात फिरण्यासाठी एक सुंदर ठिकाण म्हणजे आंबोली घाट.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा घाट त्याच्या अत्यधिक पर्जन्यवृष्टीसाठी आणि परिणामी बहरलेल्या निसर्गासाठी ओळखला जातो.
पावसाळ्यात इथे सर्वत्र हिरवळ, घनदाट धुके आणि अगणित धबधबे दिसतात.
इथे हिरण्यकेशी मंदिर, कावळेसाद पॉईंट आणि अनेक लहान-मोठे धबधबे आहेत.
गोव्यापासून आंबोली घाटाचं अंतर सुमारे 119 किलोमीटर आहे. गाडीने जायला साधारण 3 ते 4 तास लागतात.